OBC आरक्षणासाठी ‘या’ तीन सरकारांचे सामूहिक प्रयत्न आवश्यक; हरी नरके

पुणे : सध्या महाराष्ट्रात ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा पेचप्रसंग निर्माण झालेला आहे. त्यावर ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरी नरके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आदर्श उत्तरासाठी केंद्र, मध्य प्रदेश, महाराष्ट्र सरकारने सामुहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

याबाबत त्यांनी एकापाठोपाठ तीन ट्विट केले. त्यांनी म्हटलं कि, सुप्रीम कोर्ट म्हणतं, तीन कसोट्यांवर टिकेल अशी ओबीसींची अनुभवजन्य सर्वांगीण, ताजी, प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय माहिती जमा करा व राजकीय आरक्षण का आवश्यक आहे ते पटवून द्या. जेव्हा असे प्रश्न विचारले जातात ज्याची आदर्श उत्तरं परीक्षकालाच माहिती नसतात, तेव्हा विद्यार्थी नापासच होणार ना? असं ते म्हणाले.

त्यासाठी मोठ्या प्रमाणात नवे सर्व्हेक्षण हाती घ्यावे लागणार आहे आणि ते काम तातडीने होणार नाही. यासाठी केंद्र सरकार, मध्य प्रदेश व महाराष्ट्र सरकार या तिघांनी एकत्र येऊन काम करायला हवे. असं त्यांनी ट्विट करून सांगितलं आहे.

Dnyaneshwar: