देशात महागाईने लोकांचे नाकेनऊ आणले आहेत. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी पासून खाण्याचे तेल, खाद्यपदार्थ तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याच चित्र आहे. अशातच आता लोकांना महागाईचा अजून एक धक्का बसला आहे. ओला कंपनीने आता प्रवाशांसाठी भाड्याचे दर वाढवले आहेत. काही दिवसांपूर्वीच उबेर कंपनीने प्रवासाच्या भाड्यात वाढ केली होती. पाठोपाठ आता ओलानेही प्रवाशांना धक्का दिला आहे. भारतातील अनेक शहरांतील ओला च्या प्रवासासाठी प्रवाशांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
अमेरिकन कंपनी असलेल्या उबेरने काही दिवसांपूर्वीच दिल्ली, नोएडा, हैद्राबादसारख्या शहरांत भांड्यामध्ये तब्बल बारा टक्क्यांनी भाडेवाढ केली होती.
आता ओलानेही काही शहरांत बारा ते पंधरा टक्क्यांनी भाडेवाढ केली आहे. अशी माहिती मीडिया रिपोर्ट्सकडून मिळाली आहे. इंधनाच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झालेली असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून ओला चालकांनी भाडेवाढीसाठी मागणी केली होती ती मान्य करण्यात आली आहे.