उस्मनाबाद : (Omraje Nimbalkar On Jagjit Singh Rana patil) शनिवार दि. 3 नोव्हेंबर रोजी पिकविम्याच्या संदर्भात उस्मनाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. शिवसेना आमदार कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पिम्याचा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा मिळावा म्हणून कैलास पाटलांनी 8 ते 10 दिवस अमरण उपोषण केलं आहे. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासाळत जात असल्याचे लक्षात आल्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून त्यांना सर्व मागण्या 10 ते 15 दिवसात पुर्ण केल्या जातील असं आश्वास्त करण्यात आलंं.
दरम्यान, महिना एक महिना उलटून गेली तरी अद्याप मागण्या पुर्ण न झाल्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली बैठक बोलावली होती. यावेळी शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार जगजित सिंग राणा पाटील उपस्थित होते. निंबाळकर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक असल्याचे पहायला मिळतात. त्यांचा तोच आक्रमकपणा आज पहायला मिळाला. जिल्ह्याधिकाऱ्यांना बोलत असताना वारंवार आतमध्ये बोलणाऱ्या राणांना निंबाळकरांना चांगल झापलं.
जगजित सिंग राणा पाटील यांचे वडील पद्मसिंह राणा पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्यातील वाद सर्वश्रूत होता. हाच वाद पुढच्या पिढीतही कायम असल्याचे दिसून येत आहे. उस्मनाबादच्या या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये वारंवार वादाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. आजही तेच झालं, जिल्हाधिकारी कार्यालयातच दोघांची शाब्दिक चकमक झाली. ‘तू जास्त बोलू नकोस, तू तूझ्या औकातीत राहा’ अशा शब्दात खासदार ओमराजे यांनी आमदार राणा यांना सुनावलं आहे.
राणा हे ओमराजेंना काय म्हणाले, ही माहीती अद्याप समोर आली नाही मात्र, तुझे संस्कार तुझी औकात मला ठाऊक आहे, अशा शब्दात ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा पाटील यांना उत्तर दिलं असल्याचे दिसून येत आहे.