अस्वच्छ बेकऱ्या एफडीएच्या रडावर… !

विनापरवाना ; काही ठिकाणी एफडीए पोहचत नसल्याने मालकाची मुजोरी

शहरातील बहुतांश बेकऱ्या विनापरवाना सुरु असून अनेक ठिकाणी स्वच्छता पाळली जात नसल्याचे चित्र आहे. येरवडा आणि लक्ष्मीनगर परिसरातील बेकऱ्यांमध्ये अद्यापही गंजलेल्या उपकरणांमधून पावाचे

आशिष रामटेके (राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क)
पुणे : शहरातील बहुतांश बेकऱ्या विनापरवाना सुरु असून अनेक ठिकाणी स्वच्छता पाळली जात नसल्याचे चित्र आहे. येरवडा आणि लक्ष्मीनगर परिसरातील बेकऱ्यांमध्ये अद्यापही गंजलेल्या उपकरणांमधून पावाचे पीठ मळले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विनापरवाना आणि अस्वच्छ बेकऱ्यांवर अन्न व औषध प्रशासना (एफडीए) कडून धडक कारवाई सुरु असली तरीही या भागातील बेकऱ्यांपर्यंत एफडीएचे हात पोहचत नसल्याचे स्थानिकांचे म्हणने आहे. त्यामुळे बेकरी मालकांचे चांगलेच फोफावत आहे. नागरिकांना दर्जेदार व स्वच्छ बेकरी पदार्थाचा लाभ घेता यावा, या अनुषंगाने आता एफडीएची सत्व परिक्षा पणाना लागली असून अशा बेकऱ्यांविरुध्द नेमकी काय कारवाई करणार हे आता गुलदस्त्यातच जमा आहे.

शहरात सुमारे 700 ते 750 छोटे-मोठे बेकऱ्या कार्यरत आहेत. यातील एक चतुर्थांश बेकऱ्या ह्या विनापरवाना सुरु असून तेथे स्वच्छता पाळली जात नसल्याची माहिती आहे. येरवडा आणि लक्ष्मीनगर या भागात तर 10 ते 15 बेकऱ्या आहेत. यातील बहुतांश बेकरी मालकांकडे शॉपऍक्‍ट लायसन्स सुद्धा नाही. एवढेच काय तर एफडीएचा परवाना काय असतो. याची त्यांना साधी कल्पना सुद्धा नाही. त्यामुळे अत्यंत घाणेरडया आणि मानवी आरोग्यास धोका होईल, अशा वातावरणात बेकरी पदार्थाचे उत्पादन होत असल्याचे येथील जागरूक नागरिकांनी दैनिक ” राष्ट्रसंचार ” च्या एका प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेत सांगितले आहे.
शहरातील प्रत्येक नागरिकास दर्जेदार बेकरी पदार्थ मिळावे या हेतूने बेकरी मालकांनी उत्पादन करणे गरजेचे आहे. ड्रेनेजच्या फुटलेल्या ठिकाणी बेकरीचे उत्पादन सुरु असून वर्षानुवर्ष न धुतलेल्या चादरीवरच पावासारखे पदार्थ ठेवले जात आहेत.

स्वच्छतागृहाचा वापर करुन आल्यानंतर हात न धूता कर्मचारी पुन्हा पदार्थ तयार करत असल्याचे चित्र येथे कायम दिसत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे. शहरात विनापरवाना आणि अस्वच्छता पाळल्या न जाणाऱ्या बेकऱ्यांविरुध्द अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या वर्षभरात जवळपास 80 हुन अधिक अस्वच्छ बेकऱ्यांची एफडीएकडून कसून तपासणी करण्यात आली आहे. त्यात दोषींना दंड सुद्धा ठोठावण्यात आला असून आतापर्यंत सुमारे दिड लाख रुपयांचा दंडाची वसूलीही करण्यात आली आहे.

स्वच्छतेच्या निकषांची काटेकोर तपासणी….

स्वच्छतेच्या निकषांची काटेकोर तपासणी करुन शहरातील सुमारे 56 बेकऱ्यांना नव्याने उत्पादनाचा परवाना देण्यात आला आहे. बेकऱ्यांची वेळोवेळी तपासणी करुन त्यातील उत्पादनाची गुणवत्ता नियंत्रित करण्यास येत आहे. बेकरी हा प्रक्रिया उद्योग आहे. त्याची नोंद आवश्‍यक असते. वार्षिक उलाढाल 12 लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या बेकऱ्यांनी परवाना, तर त्यापेक्षा कमी उलाढाल असलेल्यांनी नोंदणी करणे आवश्‍यक आहे. परवान्यासाठी 3 हजार रुपये वार्षिक शुल्क असून नोंदणीसाठी 100 रुपये भरावे लागतात. हे परवाने किंवा नोंदणी करुन घेण्यापूर्वी प्रत्येक बेकरीतील स्वच्छतेच्या निकषांची काटेकोर तपासणी करण्यात येईल.

अस्वच्छता 16 बेकऱ्यांवर कारणे दाखवा नोटीस …

पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील बेकऱ्यांची तपासणीची मोहीम जानेवारीपासून हाती घेण्यात आली आहे. त्या मोहिमेंतर्गत आतापर्यंत ८२ बेकऱ्यांना नोटिसा देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ८२ पैकी पुणे जिल्ह्यात ५४ बेकऱ्या आहेत. जिल्ह्यात १6 बेकऱ्या विना परवाना व्यवसाय करीत असल्याचे आढळले. या १6 बेकऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. काही बेकऱ्यांमध्ये अस्वच्छता आढळली. त्याशिवाय ५४ पैकी १5 बेकऱ्यांमध्ये भट्टी असलेल्या ठिकाणीच कामगार राहत असल्याने त्या बेकऱ्यांनादेखील कामगारांच्या सोयी सुविधेचा अभाव असल्याने नोटीस देण्यात आली आहे.

दोषी बेकऱ्यांविरुध्द दंडात्मक तरतूद..

शहरात तपासलेल्या बेकऱ्यांपैकी शंभरांहून अधिक बेकऱ्यांची फेरतपासणी सुरु आहे. यातील काही बेकऱ्यांना सुधारण्याची संधी सुद्धा देण्यात आली आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत बेकऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. दोषी आढळलेल्या बेकऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद या कायद्यात आहे.

शहरातील बहुतांश बेकऱ्यांमध्ये स्वच्छता पाळली जात नाही. शहरात बेकऱ्यांची संख्या अधिक असल्याने एकाच वेळी त्या बेकरीपर्यंत पोहचणे शक्‍य नाही. तपासणीत काही बेकऱ्या सुटल्या असतील, तर त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल सध्या शहरातील अनधिकृत, विनापरवाना आणि अस्वच्छता पाळल्या जाणाऱ्या बेकऱ्यांविरुध्द धडक मोहीम राबविण्यात येत आहे. बहुतांश बेकऱ्यांकडे अधिकृत परवाना सुद्धा नाही.दोषी आढळलेल्या बेकऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कठोर कारवाई येईल.
— संजय नारगुडे, सहआयुक्त एफडीए (पुणे विभाग)

अशी काळजी घ्या

– xxx तील बहुतांश बेकऱ्यांमध्ये स्वच्छता पाळली जात नाही. शहरात बेकऱ्यांची संख्या अधिक पोहचणे शक्‍य नाही. तपासणीत काही बेकऱ्या सुटल्या असतील, तर त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल सध्या शहरातील अनधिकृत, विनापरवाना आणि अस्वच्छता पाळल्या जाणाऱ्या बेकऱ्यांविरुध्द धडक मोहीम राबविण्यात येत आहे. बहुतांश बेकऱ्यांकडे अधिकृत परवाना सुद्धा नाही.दोषी आढळलेल्या बेकऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कठोर कारवाई येईल.

-xxx तील बहुतांश बेकऱ्यांमध्ये स्वच्छता पाळली जात नाही. शहरात बेकऱ्यांची संख्या अधिक पोहचणे शक्‍य नाही. तपासणीत काही बेकऱ्या सुटल्या असतील, तर त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल सध्या शहरातील अनधिकृत, विनापरवाना आणि अस्वच्छता पाळल्या जाणाऱ्या बेकऱ्यांविरुध्द धडक मोहीम राबविण्यात येत आहे. बहुतांश बेकऱ्यांकडे अधिकृत परवाना सुद्धा नाही.दोषी आढळलेल्या बेकऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कठोर कारवाई येईल.

-xxx तील बहुतांश बेकऱ्यांमध्ये स्वच्छता पाळली जात नाही. शहरात बेकऱ्यांची संख्या अधिक पोहचणे शक्‍य नाही. तपासणीत काही बेकऱ्या सुटल्या असतील, तर त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल सध्या शहरातील अनधिकृत, विनापरवाना आणि अस्वच्छता पाळल्या जाणाऱ्या बेकऱ्यांविरुध्द धडक मोहीम राबविण्यात येत आहे. बहुतांश बेकऱ्यांकडे अधिकृत परवाना सुद्धा नाही.दोषी आढळलेल्या बेकऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कठोर कारवाई येईल.

-xxx तील बहुतांश बेकऱ्यांमध्ये स्वच्छता पाळली जात नाही. शहरात बेकऱ्यांची संख्या अधिक पोहचणे शक्‍य नाही. तपासणीत काही बेकऱ्या सुटल्या असतील, तर त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल सध्या शहरातील अनधिकृत, विनापरवाना आणि अस्वच्छता पाळल्या जाणाऱ्या बेकऱ्यांविरुध्द धडक मोहीम राबविण्यात येत आहे. बहुतांश बेकऱ्यांकडे अधिकृत परवाना सुद्धा नाही.दोषी आढळलेल्या बेकऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कठोर कारवाई येईल.

Sumitra nalawade: