G20 च्या मुहूर्तावर पुण्यात दुसऱ्या दिवशीही गॅस पाईपलाईनला आग

पुणे | Pune News – जगातील आर्थिकदृष्ट्या प्रगत 20 देशांची ‘जी 20 परिषद’ पुण्यात होणार आहे. जानेवारी आणि जूनमध्ये या परिषदेच्या तीन बैठका पुण्यात होणार आहेत. या बैठकीसाठी विविध 100हून अधिक प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिकेनं शहराचं सौदर्यीकरण करण्याचं काम हाती घेतलं आहे. अशातच पुण्यात आगीच्या घटना घडताना दिसत आहेत. काल सिंहगड रोड येथे गॅस पाईपलाईनला आग लागली होती. तर आज (14 जानेवारी) पुन्हा एकदा एमएनजीएल गॅस पाईपलाईनला आग लागल्याची घटना घडली आहे. पहाटे 4.16 वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात खराडी येथील विठ्ठल बोराटे नगर येथे एमएनजीएल गॅस पाईपलाईनला आग लागली होती. तसंच याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून येरवडा अग्निशमन केंद्रातील वाहन रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचताच रस्त्यावर एमएनजीएल या कंपनीची पाईपलाईन व तिथेच जवळपास असणारी एक हातगाडी पेटल्याचं जवानांनी पाहिलं असता त्यांनी तातडीनं पाण्याचा सतत मारा सुरू ठेवून आग विझवली. तसंच सदर ठिकाणी एमएनजीएलचे कर्मचाऱ्यांनी धाव घेत तेथील इतर लाईन बंद केली होती. ज्या ठिकाणी आग लागली होती तेथे खोदकाम सुरू असल्याचं निदर्शनास आलं असून या घटनेत कोणीही झालेलं जखमी नाही. तर एक दिवसापुर्वीच सिहंगड रस्त्यावर राजाराम पुलावर अशीच मोठी घटना घडली होती.

या कामगिरीत येरवडा अग्निशमन केंद्र येथील चालक रघुनाथ भोईर व जवान उमाकांत डगळे, विलिन रावतु, नवनाथ वायकर, अमित वाघ यांनी सहभाग घेतला होता.

Sumitra nalawade: