मुंबई | Prasad Oak Video Viral | सध्या मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Film Industry) एकामागोमाग एक सुपरहीट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. यामध्येच प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक (Actor Prasad Oak) याची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) हा चित्रपट (Movie) त्यापैकी एक आहे. या चित्रपटाने प्रदर्शित होताच महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. १३ मे २०२२ या दिवशी या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटानं बॅाक्स ऑफीसवर (Box Office) दमदार कमाई केली आहे. तसंच आता प्रसाद ओकने सोशल मीडियावर (Social Media) शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.
प्रसाद ओकचे चाहते म्हणजेच आचार्य श्री धर्मराज गुरुजी (Shri Dharmraj Guruji) यांनी ‘धर्मवीर’ पाहण्यासाठी संपूर्ण चित्रपटगृहच बूक केलं. त्यांनी स्वतः एकट्याने बसून हा चित्रपट पाहिला. यादरम्यानचा आचार्य श्री धर्मराज गुरुजी यांचा व्हिडीओ शेअर करत प्रसाद म्हणाला, “धर्मवीर चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात फक्त एकच माणूस? मराठी कलाकाराच्या बाबतीत किंवा मराठी सिनेमासृष्टीत हे कदाचित पहिल्यांदाच घडत असावं. याचं कारण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच कळेल.”
तसंच प्रसादने आचार्य श्री धर्मराज गुरुजी यांचे आभार मानले आहेत. धर्मराज गुरुजी यांनी देखील प्रसादचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. “माझी इच्छा होती की मी एकट्यानेच हा चित्रपट पाहावा. प्रसाद ओक कोणत्याही कार्यक्रमात जातात तिथे ग्लॅमर हे पाहायला मिळतं. प्रसाद म्हणजे अष्टपैलु कलाकार आहेत. तुम्हाला मी धन्यवाद देऊ इच्छितो. तुमचा हा चित्रपट बघत असताना मला माझ्या आजूबाजूला अजिबात आवाज नको होता. मला या चित्रपटात फक्त आणि फक्त तुम्हाला बघायचं होतं.” असं धर्मराज गुरुजी यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.