वडापाव प्रेमींसाठी फक्त “रोहित वडेवाले”

वडापाव हा सर्वांत लोकप्रिय असा पदार्थ आहे. वडापावचं नाव जरी ऐकलं तरी प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतंच. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला वडापाव खाल्ल्याशिवाय राहावत नाही. तसेच वडापाव खाण्यासाठी कोणतीही ठरावीक वेळ नसते. जशी इच्छा होईल तसा वडापावचा आस्वाद खवय्ये घेत असतात. तर अशाच वडापाव प्रेमींसाठी सिद्धेश जैद यांचं रोहित वडेवाले’ हे प्रसिद्ध आहे. तसंच रोहित वडेवाले हे हॉटेल खवय्यांना तळलेला, चमचमीत, चविष्ट असा वडापाव खाऊ घालत आहेत. मालक सिद्धेश जैद यांचं रोहित वडेवाले हे हॉटेल पुणे-नाशिक हायवे लगत (कल्याणी कंपनीसमोर) नायरा पेट्रोल पंपाशेजारी, कुरूळी ता. खेड जि. पुणे- ४१०५०१ येथे आहे. विशेष म्हणजे रोहित वडेवाले या हॉटेलने खवय्यांना चविष्ट आणि झणझणीत वडापाव खाऊ घातल्याने भुरळ पाडली आहे.

रोहित वडेवाले या हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक वडापाव प्रेमी हा तिखट चमचमीत वडापाव खाऊन मंत्रमुग्ध होतो. या हॉटेलची खासियत सांगायची झाली तर या हॉटेलमध्ये पाच प्रकारच्या स्वादिष्ट वडापावचा आस्वाद घेता येतो. हा ५ वेगवेगळ्या वडापावचा आस्वाद फक्त याच हॉटेलमध्ये घेता येईल. सोबतच या हॉटेलमधील आदरातिथ्य खवय्यांना पुन्हा पुन्हा रोहित वडेवाले हॉटेलमध्ये यायला भाग पाडतं. तसेच सिद्धेश जैद यांनी ४ कामगारांना सोबत घेऊन चालू केलेलं हे हॉटेल आज मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे.

याचप्रमाणे रोहित वडापाव यांनी आपल्या पदार्थांची चव कायम राखली आहे. त्यामुळे येथे नेहमी खवय्यांची गर्दी पाहायला मिळते. तसेच सर्वसामान्य लोकांना खिशाला परवडेल अशा दरात येथील वडापाव मिळतात. त्याचबरोबर या हॉटेलमध्ये बसण्यासाठी स्वच्छ जागा, प्रसन्न वातावरण आणि पदार्थांची चव यामुळे हे हॉटेल सर्वांच्या आवडीचं बनलं आहे. चला तर मग उशीर कशाला करताय. लवकर भेट द्या हॉटेल रोहित वडेवालेला. स्वादिष्ट आणि चमचमीत वडापाव खाण्यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबातील सदस्यांसोबत अवश्य भेट द्या रोहित वडेवाले’’ हॉटेलला.

Dnyaneshwar: