पुणे : (Pune Bundh) छत्रपती शिवाजीमहाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्याने आमच्या भावना दुखावल्या गेल्या असून, या वक्तव्याचा खेदजनक निषेध व्यक्त करीत पुण्यातील ३६ गणेशोत्सव मंडळांनी मंगळवारी पुकारलेल्या पुणे बंदच्या आवाहनाला पाठिंबा दिला. (Opposition Demands Pune Bundh On 13th december)
या संदर्भात पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व शहराध्यक्ष अरविंद शिंदे व पुणे बंद कृती समितीच्या सदस्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी पुणे बंदला पाठिंबा दर्शविला.
बैठकीस पक्षाचे पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्हयातील सर्व आमदार, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते .
बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होवू लोकशाही मार्गाने बंद पार पाडावा असे आवाहन करण्यात आले आहे.