आर. एम. डी सिंहगड वारजे येथे योग प्रशिक्षण

पुणे | आर. एम. डी. सिंहगड वारजे येथे राष्ट्रीय सेवा योजना एकक व सहज योगा मेडिटेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसाचे योग प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या तीन दिवशी योग प्रशिक्षण कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या तीन दिवसीय योग प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. दीक्षित यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. शरद मुळीक (डीन ॲकडमिक्स), डॉक्टर स्वाती विजय (डीन एमबीए), डॉक्टर शिखा सक्सेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर घुगे, स्पोर्ट डायरेक्टर राहुल निकम तसेच सहज योगा मेडिटेशन चे प्रशिक्षक उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. दीक्षित यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की आताचे युग स्पर्धेचे युग आहे आणि या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी मानसिक दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे आणि याचे एकमेव साधन म्हणजे योग प्रशिक्षण हे आहे. विचारातील नकारात्मकता घालवायचे असेल तर योग अभ्यास हा उत्तम मार्ग आहे असे सरांनी बोलताना विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये योग प्रशिक्षणाचा मोलाचा वाटा आहे.

या तीन दिवसीय शिबिराच्या आयोजनाची उद्दिष्ट हे कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी यांना योग शिक्षणाची आवड व्हावी आणि यातून त्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास घडून यावा हा होता. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये विविध कारणामुळे कर्मचारी वर्ग असेल किंवा विद्यार्थी असतील यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. योग शिक्षणामुळे विद्यार्थी व कर्मचारी वर्ग यांना नक्कीच तणावमुक्त आनंदी जीवन जगता येईल. डॉ. व्ही व्ही दीक्षित यांनी कार्यक्रम आयोजकांचे आभार मानले व तसेच त्यांना मार्गदर्शन व केलेल्या कार्यक्रमाबद्दल त्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे आयोजन हे डॉ. शिखा सक्सेना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी श्री. ज्ञानेश्वर घुगे व श्री. राहुल निकम (स्पोर्ट डिपार्टमेंट) यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

Sumitra nalawade: