“RRR बॉलिवूडचा?”ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील त्या एका वाक्याने गदारोळ

Oscars 2023 : लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. ऑस्कर हा कलाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. आयुष्यात एकदा तरी हा पुरस्कार आपल्या नावे व्हावा, अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतासाठी खूप खास ठरला. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताने इतिहास रचला. एस. एस. राजामौली यांच्या RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावला. सिनेमाने ऑस्कर पुरस्कार तर मिळवला, पण होस्ट सिनेमाबद्दल असं काही म्हणाला, ज्यामुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. सध्या सर्वत्र आरआरआर सिनेमाची चर्चा रंगली आहे. शिवाय व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

दरम्यान, ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचा होस्ट जिमी किमेल याने पुरस्कार सोहळ्यादरम्यान एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ सिनेमाचा उल्लेख बॉलिवूड सिनेमा म्हणून केला. ज्यामुळे ट्विटरवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. जिमी किमेल पुरस्कार सोहळ्यादरम्यान विभागाची घोषणा करत होता. तेव्हा आरआरआर गाण्यावर स्टेप करत त्याने काही डान्सर्सना बाजूला केलं. तेव्हा ‘आरआरआर’ सिनेमाचा उल्लेख त्याने बॉलिवूड सिनेमा म्हणून केला.

Dnyaneshwar: