परदेश वारी करणारे ‘राजसी कलेक्शन’

aeae5b27 c985 4d21 8c66 d0a5fae0c3f7aeae5b27 c985 4d21 8c66 d0a5fae0c3f7

माझे माहेर सदाशिव पेठ आणि सासर निगडी… मी एमबीए मार्केटिंग केलंय आणि हिंजवडी येथील एका फायनान्स आयटी कंपनीत काम करते.

नोव्हेंबर २०१९ मध्ये गोव्यात असताना मनात कोणता तरी व्यवसाय सुरू करण्याची कल्पना आली आणि व्यवसाय सुरू करण्याचे निश्चित केले. मी ही कल्पना माझ्या नवर्‍याला सांगितली आणि त्याच्याकडून होकार मिळाला मग काय ठरले मग… असे ‘राजसी कलेक्शन’च्या सायली नचिकेत आराध्ये माहिती देताना म्हणाल्या. ज्वेलरी आणि महिला यांचे एकमेकांशी अतूट नाते असते. यामध्ये ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी म्हणजे काय? त्यातले प्रकार, त्यात वापरलेले मटेरियल, खडे, देशभरातील त्याचे विक्रेते याचा बराच अभ्यास केला, तसेच व्यवसाय करायचा म्हणजे त्यात नफा आणि तोटा आलाच. मी ठरवलेल्या व्यवसायात गुंतवणुकीबाबत सर्व शक्यता पाहता सर्व गोष्टींचा अगदी बारकाईने विचार केला आणि सुरू झाला आमच्या राजसी कलेक्शनचा प्रवास…

छोट्या प्रमाणात सुरू झालेला व्यवसाय उभारी धरत होता. छोट्या-मोठ्या प्रदर्शनात भाग घेतला आणि उत्तम प्रतिसाद मिळाला, त्यातच मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे जगभरात लॉकडाऊन चालू झाले आणि ३ महिने सगळेच व्यवहार बंद झाले. पण पुन्हा जूनमध्ये आम्ही परत एकदा नव्याने काम चालू केले. आई आणि नवरा ह्यांची कायम साथ होती आणि प्रयत्नांना यश मिळू लागले. ऑगस्ट महिना संपता संपता आम्ही ट्रेंडीसोबत पारंपरिक पद्धतीचे नथ, बुगडी, ठुशी, कोल्हापुरी साज, बांगड्या हे दागिनेदेखील समाविष्ट केले आणि गणपती, नवरात्र व दिवाळी ह्या सणांमध्ये त्याला भरघोस व्यवसाय मिळाला.

ज्वेलरी उठून दिसण्यासाठी काही फोटोशूट्सदेखील केले आणि घरातल्या घरात फोटोग्राफी करण्यासाठी लागणारी सर्व साधने पण हळूहळू गोळा झाली. दिवसेंदिवस खप वाढायला लागला. ऑनलाईन, फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा जर योग्य प्रकारे वापर केला तर खूप छान व्यवसाय करता येऊ शकतो, हे लॉकडाऊनकाळात प्रकर्षाने जाणवले. विशेषत: फेसबुकसमूहांचे प्रचंड सहकार्य लाभले.

ह्या ३-४ महिन्यांत आम्ही महाराष्ट्रात अन्यत्र याचबरोबर उत्तराखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, केरळ तसेच काही ऑर्डर परदेशातही पाठवल्या. डिसेंबरमध्ये एका छोटेखानी प्रदर्शनाने लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे भेटण्याची संधी मिळाली आणि तेव्हा जाणीव झाली, की आता आपल्याला मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे, म्हणून आम्ही सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करायला सुरुवात केली, आता ट्रेंडी आणि पारंपरिक ह्यासोबतच अमेरिकन डायमंड ज्वेलरीपण आहेत. दर महिन्याला फेसबुक लाईव्ह, पुणे आणि पुण्याबाहेर प्रदर्शनामध्ये आता आम्ही नियमितपणे भाग घेतोय.

सुरुवातीला सहज चालू केलेला हा उद्योग आता मोठा झाला आहे, त्याने मिळवून दिलेल्या ४ उदयोन्मुख उद्योजिका पुरस्कारांनी ते सिद्धच केले, २०२०-२१ जरी इतर अनेक कारणांनी खडतर गेले असले तरी मला आणि आमच्या ‘राजसी कलेक्शन’ला अतिशय उत्तम गेले.

Dnyaneshwar:
whatsapp
line