Pak Vs Nepal : रणसंग्राम सुरु! ‘आशिया कप’ला दिमाखात सुरुवात, कोण देणार विजयी सलामी?

Pak Vs Nepal Asia Cup 2023 : पाकिस्तानमधील मुल्तान येथील मैदानावर आशिया चषकाला दिमाखात सुरुवात झाली. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यामध्ये सलामीच्या सामन्याला सुरुवात झाली. पाकिस्तान संघ आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. नेपाळपुढे तगड्या पाकिस्तानचे आव्हान असेल.

पाकिस्तानची धुरा अनुभवी बाबर आझम याच्याकडे असेल तर नेपाळची धुरा 20 वर्षीय रोहितच्या खांद्यावर आहे. सहा संघामध्ये एकदिवसीय फॉर्मेटमध्ये आशिया चषक होणार आहे. भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरोधात होणार आहे. सहा संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे.

नेपाळच्या संघाने आशिया चषकात पदार्पण केले आहे. 20 वर्षीय रोहित पौडेल याच्याकडे नेपाळच्या संघाची धुरा आहे. नाणेफेकीवेळी रोहित म्हणाला की, संघातील सर्व सहकारी आनंदात आहेत. आशिया चषकात आमचा पहिलाच सामना आहे. नेपाळमधील प्रत्येक व्यक्ती उत्साहित आहे.

नेपाळने आशिया चषकात आज पदार्पण केले. आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये नेपाळ संगाने दमदार कामगिरी केली आहे. पण पाकिस्तानविरोधात विजय मिळवणं नेपाळसाठी सोपं नसेल. पण नेपाळकडे गोलंदाजी दमदार आहे. संदीप लामिछाने हा अनुभव गोलंदाज आहे, तो एक्स फॅक्टर ठरु शकतो.

Prakash Harale: