पाकिस्तान क्रिकेट मध्ये भूकंप! बाबर आझमची कर्णधार पदावरून हकालपट्टी? ‘या’ खेळाडूकडे जबाबदारी

Pakistan Cricket Babar Azam : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. पीएसएल म्हणजेच पाकिस्तान सुपर लीग सध्या पाकिस्तानमध्ये खेळली जात आहे आणि जवळपास सर्वच मोठे खेळाडू त्यात सहभागी झाले आहेत. त्याचवेळी पाकिस्तानी संघाला आता काही दिवसांनंतर अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. याआधी एक मोठा बदल करण्यात आला आहे.

पीसीबीने शादाब खान संघाचा नवा कर्णधार असल्याची घोषणा केली आहे. कर्णधारासोबतच संघातील 15 सदस्यांची घोषणा करण्यात आली आहे. पण या संघाची खास बाब म्हणजे बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानसोबत शाहीन शाह आफ्रिदीचे नाव नाही. त्यामुळेच त्यांना प्रश्न पडला आहे की बाबरची कर्णधार पदावरून हकालपट्टी झाली का काय ?

शादाब खान अफगाणिस्तानविरुद्ध संघाची कमान सांभाळताना दिसणार असल्याची घोषणा पीसीबीचे प्रमुख नजम सेठी यांनी केली आहे. संघाची घोषणा करताना पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी म्हणाले – शादाब खानची पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केल्याबद्दल मी त्याचे अभिनंदन करू इच्छितो. शादाब खान गेल्या काही वर्षांपासून व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा उपकर्णधार आहे.

तीन सामन्यांच्या T20I दौऱ्यासाठी बाबर आझमच्या अनुपस्थितीत तो संघाचे नेतृत्व करेल हे तर्कसंगत आहे. मोहम्मद युसूफ यांची आम्ही अंतरिम प्रमुख आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. युसूफ गेल्या वर्षभरापासून फलंदाजी प्रशिक्षक होता.

Prakash Harale: