काय सांगता! पाकिस्तानमुळे मान्सून महाराष्ट्रात उशिरा दाखल

मुंबई | Monsoon 2022 – पाकिस्तातून सतत येणाऱ्या वाऱ्यांमुळे मान्सून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर अडकला आहे. दरम्यान अरबीसमुद्रातून मान्सूनची वाटचाल योग्य असली तरी पाकिस्तानातून जोरात येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील काही भागातून मान्सूनला पुढे सरकता येत नाही. IMD ने दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशातील बडवाणीमध्ये मान्सून थांबला आहे. दरम्यान मान्सूनने वाटचाल केल्यास बडवानी आणि इंदूरऐवजी जबलपूरमार्गे महाराष्ट्रात मान्सून प्रवेश करण्याची शक्यता आहे. जबलपूरमध्ये मंगळवारी सायंकाळपासून हलका पाऊस सुरू झाला आहे.

बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या हालचाली तीव्र झाल्याने हा पाऊस होत आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ वेदप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, जबलपूर आणि त्याच्या लगतच्या भागात दोन दिवस पावसाचा जोर वाढणार आहे, तर माळवा-निमारमध्ये दोन दिवस पाऊस हुलकावणी देण्याची शक्यता आहे. भोपाळमध्ये देखील मान्सून 18 तारखेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

हवामानतज्ञ वेदप्रकाश सिंह म्हणाले की, अरबी समुद्रात मान्सून सक्रिय झाला आहे. तो पुढे सरकत आहे, मात्र पाकिस्तानकडून सतत येणाऱ्या वाऱ्यांमुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर तो अडकला आहे. बुधवारपासून पाकिस्तानकडून वाऱ्याची दुसरी फेरी मध्य प्रदेशात येणार आहे. आता एक प्रणाली आधीच सक्रिय आहे. अशा स्थितीत अरबी समुद्रातून येणारा मान्सून आणखी पुढे जाण्यास अडथळे होणार आहेत.

Sumitra nalawade: