शाहरूख खानसोबतच्या किस सीनबाबत पाकिस्तानी अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाली, “मला तिथे स्पर्श करून…”

मुंबई | Mahira Khan – ‘रईस’ चित्रपटातून पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खाननं (Mahira Khan) बाॅलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ‘रईस’ (Raees) चित्रपटात माहिरा खान अभिनेता शाहरूख खानसोबत (Shah Rukh Khan) मुख्य भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अशातच माहिरा खाननं शाहरूख खानसोबतच्या किस सीनबाबत खुलासा केला आहे.

‘रईस’ चित्रपटात जालिमा हे एक रोमँटिक गाणं शूट करण्यात आलं होतं. या गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा माहिरा खाननं सांगितला आहे. माहिरानं जालिमा गाण्याच्या शूटिंगशी संबंधित काही मजेशीर किस्से एका पाॅडकास्टमध्ये शेअर केले आहेत. ती म्हणाली की, “हे गाणं रोमँटिक होतं ज्यात मला शाहरूखसोबत रोमान्स करायचा होता. सोबतच यात मला हाॅट आणि सेक्सीही दिसायचं होतं. त्यामुळे मी या गाण्याच्या शूटिंगच्या दिवशी खूप घाबरले होते. कारण मी पाकिस्तानची असल्यामुळे माझे स्वत:चे नियम आहेत. मला पडद्यावर किस करायचं नव्हतं आणि कसलेही उघडे कपडे घालायचे नव्हते.”

“त्यावेळी शाहरूख मला चित्रपटाच्या सेटवर खूप चिडवायचा. मला तो सीन कराताना भीती वाटायची म्हणून सगळे हसायचे. मग मी त्यांना म्हणायचे की तुम्ही मला इथे स्पर्श करून मला कीस करू शकत नाही. तर ‘पुढचा सीन कोणता आहे माहिती का?’ असं म्हणत शाहरूख मला चिडवायचा, असंही माहिरानं सांगितलं.

Sumitra nalawade: