संभलमध्ये सापडली पाकिस्तानी काडतुसे; हिंसाचाराचा पोलिसांच्या एसआयटीकडून तपास

संभलमध्ये सापडली पाकिस्तानी काडतुसे

उत्तर प्रदेशातील संभल येथे मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचाराचा तपास करत असताना पोलिसांना पाकिस्तान आणि अमेरिकेत बनवलेली काडतुसे सापडली. एका नाल्याजवळ ही काडतुसे जमिनीत पुरून ठेवण्यात आली होती. याप्रकरणाच्या तपासासाठी मंगळवारी ३ डिसेंबर २०२४ रोजी संभल येथे पोहोचलेल्या पोलीस एसआयटीला एकूण ६ काडतुसे सापडली आहेत.

हे संबंधित काडतुसे हे ९ एमएमचे होते अशी माहिती तपासातून समोर आली आहे.. एका काडतुसावर मेड इन यूएसए असे लिहिण्यात आले होते. हे काडतुसे ३२ कॅलिबरचे होतचे असे तपासात सांगण्यात आले. दुसऱ्या काडतुसावर एफएन स्टार असा टॅग लावण्यात आला होता. फॉरेन्सिक पथकाला हे सर्व काडतुसे नाल्याजवळ मातीत गाडलेली आढळली आहेत. याप्रकरणात कृष्णा कुमार बिश्नोई यांनी ही गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे.

हे प्रकरण २४ नोव्हेंबर २०२४ रोजी घडले होते. मात्र त्यादिवशी मोठ्या प्रामाणात हिंसाचार झाला होता. त्या भागातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड करण्यात आली होती. जे सीसीटीव्ही कॅमेरे होते अशा परिस्थितीत त्यांची तपासणी करत पुरावे गोळा केले जातील, असे त्यांनी सांगितले आहे.

१९ नोव्हेंबर २०२४ रोजी संभल येथील जिल्हा न्यायलयाने जामा मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले होते. जामा मशिदीठिकाणी पूर्वी शंकर महादेवाचे मंदिर होते. जे मुघलांनी आक्रमण करत उद्ध्वस्त केले होते. हे सर्वेक्षण १९ नोव्हेंबर रोजी पूर्ण होऊ शकलो नसल्याचे म्हणणे आहे.

याप्रकरणात पुन्हा २४ नोव्हेंबर रोजी पोलीस प्रशासनाने जामा मशिदीठिकाणी धाव घेतली होती. जामा मशिदीच्या आसपासच्या भागात जमलेल्या मुस्लिम जमावाने हिंसाचार सुरू केला. यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले असून एक पोलीस अधिकारी अनुज चौधरी यांनाही गोळी लागल्याची घटना घङली होती.

Rashtra Sanchar: