पाकिस्तानी चित्रपट ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ या तारखेला भारतात होणार प्रदर्शित!

नवी दिल्ली : (Pakistani Film The Legend Of Maula Jatt Release In India) चित्रपट ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’  हा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटानं पाकिस्तानमध्येच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. रिलीज झाल्यानंतर काही दिवसांनंतर या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली.  ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ (The Legend Of Maula Jatt) मध्ये अभिनेता फवाद खान (Fawad Khan) आणि अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट भारतात रिलीज होणार आहे असं म्हटलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट आधी 23 डिसेंबर रोजी भारतात रिलीज होणार होता. पण आता हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी भारतात रिलीज होऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पाकिस्तानमध्ये तसेच जगभरात हा चित्रपट 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 200 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.

फवाद खान आणि माहिरा खान यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते भारतातही खूप लोकप्रिय आहेत. त्यांची ‘हमसफर’ ही प्रसिद्ध मालिकाही येथे हिट झाली होती. ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट 1979मध्ये आलेल्या युनुस मलिक दिग्दर्शित ‘मौला जट’ चित्रपटाचा रिमेक आहे. फवाद खानच्या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडला 51 कोटींचे रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले.  ‘द लीजेंड ऑफ मौला जट’ हा चित्रपट 25 देशांमध्ये सुमारे 500 स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे.

Prakash Harale: