पाकिस्तानी सीमा हैदर करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? निर्मात्याने सचिनलाही दिली चित्रपटात काम करण्याची ऑफर

Seema Haider Case | पाकिस्तानी सीमा हैदर (Seema Haider) सध्या चांगलीच चर्चेत आहे. ती भारतीय सचिन मीनाच्या (Sachin Meena) प्रेमासाठी पाकिस्तीनी सीमा पार करून थेट भारतात आली. भारतात आल्यानंतर सीमा आणि सचिन या दोघांनी लग्न केलं. त्यानंतर सगळीकडे या दोघांचीच चर्चा सुरू आहे. तसंच सीमा बेकायदेशीरपणे भारतात आल्यामुळे तिच्यावर संशयही व्यक्त केला जात आहे. अशातच आता पाकिस्तानी सीमाला हिरोईन बनण्यासाठी ऑफर मिळाली आहे. सीमासोबत तिचा पती सचिनलाही चित्रपटाची ऑफर मिळाली आहे.

बॉलिवूड निर्माता अमित जानी यांनी सीमा हैदरला हिरोईन होण्यासाठी ऑफर दिली आहे. तर सचिन मीनालाही त्यांनी चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे. अमित जानी या निर्मात्यानं सीमा आणि सचिन यांना मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत त्यांना चित्रपटाची ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट राजस्थानमधील टेलर कन्हैयाच्या हत्येवर आधारित आहे. तर आता सीमा आणि सचिन ही मोठी ऑफर स्विकारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, सीमा आणि सचिन त्यांच्या कुटुंबासह नोएडा येथे राहत आहे. मात्र, आता हे कुटुंब आर्थिक संकटात सापडले असून याबाबत सचिनच्या वडिलांनी पोलिसांना पत्र लिहिलं आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, सचिन मीनाचे वडील नेत्रपाल मीना यांनी वरिष्ठ पोलिसांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी त्यांच्या कुटुंबाला खाण्यापिण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असून आर्थिक स्थिती निर्माण झाल्याचं म्हटलं आहे.

admin: