पुणे:पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएल) अंतर्गत महिला प्रवाशांची गैरसोय वाढत आहे पीएमपीएमएल बस मध्ये आपत्कालीन बटन बंद असल्याची धक्कादायक चित्र दिसून आले आहे. महिलांच्या सुरक्षित प्रवासाची विश्वासार्ह मानली जाणाऱ्या पीएमपीएमएल बसमध्ये आपत्कालीन बटण बंद आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदत मागण्याचे हे प्रमुख साधन बंद असल्याने महिला प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. छेडछाड, आरोग्य समस्या किंवा अपघाताच्या वेळी मदत मिळणे कठीण झाल्याने महिलांना रात्रीच्या वेळी बसचा वापर करण्यास भीती वाटत आहे. या गंभीर समस्येबाबत प्रवाशांमध्ये नाराजी चे वातावरण पाहायला मिळाले. प्रशासनाकडून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. सर्व बसमधील आपत्कालीन बटणे तातडीने कार्यान्वित करणे, त्यांची नियमित तपासणी करणे आणि महिलांसाठी विशेष हेल्पलाइन सुरू करणे त्यासोबतच आपत्कालीन हेल्पलाइन नंबर चे फलक सर्वत्र बस मध्ये चिकटवणे यासारख्या उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक वाहतूक ही केवळ प्रवासासाठीची सोय नसून, ती प्रवाशांची सुरक्षितताही सुनिश्चित करणारी असावी. पीएमपीएमएल प्रशासनाने या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे