फडणवीस-बावनकुळे बीडला, पण मुंडे भगिनींची कार्यक्रमाकडे पाठ, नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण

बीड : (Pankaja Munde absent in Devendra Fadnavis’ Beed district Programs) राज्यातील भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे बीड दौऱ्यावर असताना, पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी कार्यक्रमाला दांडी मारल्याने चर्चेला उधान आलं आहे. सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बीडमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थितीत होते.

दरम्यान, भाजपचे दिग्गज नेते आपल्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना, आलेल्या पक्षातील नेत्यांचे स्वागत करुन कार्यक्रमाला उपस्थिती लावणे अपेक्षित होते. मात्र, भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्याकडून सफसेल याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे मुंडे भगिनी पक्षावर नाराज असलेल्या चर्चेला पुन्हा एकदा खतपाणी मिळालं असून, राजकीय वर्तुळात कुजबूज सुरु झाली आहे.

मध्यंतरी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना संधी न दिल्यामुळे पंकजा मुंडे कमालीच्या नाराज झाल्याचं बोललं जात होतं. त्यांना राज्यातील भाजप नेत्यांकडून वेळोवेळी डावलण्यात येत असल्याच्या त्यांच्या समर्थकांकडून जाहिर सांगण्यात आलं आहे. त्यांनी देखील याबाबतीत दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट सुद्धा घेतली होती. त्यानंतर पंकजा मुंडे आणि फडणवीस यांच्यामध्ये दरी निर्माण झाल्याची चर्चा होती. आता बीडमध्ये फडणवीस आले असताना मुंडेंनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे विरोधकांना आयत कोलित मिळणार आहे.

Prakash Harale: