“जो आडवा येईल त्याला आडवं करेन”; पंकजा मुंडेंचा बीडमध्ये एल्गार

बीड : (Pankaja Munde On Maratha Reservation) “दुधाने तोंड पोळलंय पण आता ताकही फुंकून पिणार, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, जो आडवा येईल त्याला आडवं करेन”, असा एल्गार भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड येथील सभेत बोलताना केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं असून त्यांनी राजकारणासाठी ‘मराठा अस्त्र’ उपसलं असल्याचं बोललं जातंय.

“ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आलं होतं त्यावेळी मी सांगितलं होतं की गळ्यात कोणताच फुलांचा हार घालणार नाही. पण ते आरक्षण वाचलं आणि ते परत आता कोर्टात अडकलं, पण मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मी फेटा बांधणार नाही.” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांना स्वपक्ष असलेल्या भाजपकडूनच दुय्यम वागणूक मिळत असून, २०१९ च्या विधानसभा निवडणूक हारल्यानंतर त्यांना पक्षाने डावलल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे आगामी निवडणूकींच्या पार्श्वभुमीवर पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाचं अस्त्र काढलं आहे अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकारणाची पुढची दिशा कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Prakash Harale: