मुंबई | Pankaja Munde’s Answer To Subodh Bhave’s Question’s – सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे करत आहे. तसंच आत्तापर्यंत या कार्यक्रमात सुप्रिया सुळे, अमृता खानविलकर, अमृता फडणवीस, मेधा मांजरेकर यांनी हजेरी लावली होती. आता लवकरच या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे सहभागी होणार आहैत. नुकतंच झी मराठीने ‘बस बाई बस’ कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे.
झी मराठीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी भागातील एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये सुबोध भावे पंकजा मुंडे यांच्याशी संवाद साधताना दिसत आहे. त्यावेळी पंकजा मुंडे यांना या कार्यक्रमात विविध राजकीय घटना, पक्ष आणि इतर खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावर त्यांनी काही हटके उत्तरं दिली आहेत.
सुबोध भावेंनी पंकजा मुंडेंना राजकीय स्थितीबद्दल एक प्रश्न विचारला. दुसऱ्या पक्षातील आमदार कधी फोडलेत का? असा प्रश्न सुबोध भावेंनी विचारला होता. त्यावर पंकजा मुंडेंनी हटके स्टाईलमध्ये उत्तर दिलं. पंकजा मुंडे म्हणाल्या, एक एक आमदार की किंमत तुम क्या जानो सुबोध बाबू. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तसंच या प्रोमोचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.