Wagh Bakri Tea: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ‘वाघ बकरी चहा’चे मालक पराग देसाई यांचं निधन

Parag Desai Passed Away | ‘वाघ बकरी चहा’चे (Wagh Bakri Tea) कार्यकारी संचालक पराग देसाई (Parag Desai) यांचं निधन झालं आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये पराग देसाई यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 49 व्या वर्षी अहमदाबाद येथील खाजगी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

15 ऑक्टोबर रोजी पराग देसाई यांचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना अहमदाबाद येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पराग देसाई हे त्यांच्या घराजवळ असलेल्या इस्कॉन अंबली रोडवर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी पराग यांना ब्रेन हॅमरेज झाल्याची माहिती दिली. तसंच पराग यांची प्रकृती खालावली होती त्यामुळे त्यांना दुसऱ्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

https://www.instagram.com/p/Cyu0CblgfcO/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

Sumitra nalawade: