ठरलं! या महिन्यात राघव-परिणीतीची सुपारी फुटणार; लग्नच्या तयारीलाही झाली सुरुवात!

मुंबई | बॉलिवूडमधील अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्या डेटिंगची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु आहे. काही दिवसांपूर्वी हे राघव चढ्ढा आणि परिणीती या दोघांच्या साखरपुड्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र, या सगळ्या तारखा चुकीच्या ठरल्या. पण, आता एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, परिणीती आणि राघव या महिन्यात साखरपुडा करणार आहेत. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा 13 मे रोजी नवी दिल्लीत लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. या बातमीने परिणीतीचे चाहते खूप उत्साहित झाले आहेत. मात्र, परिणीती चोप्रा किंवा राघव चड्ढा यांच्याकडून या बातम्यांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

काही दिवसांपूर्वी हे राघव चढ्ढा आणि परिणीती हे दोघं एकत्रित डिनर करताना दिसून आले होते, त्यानंतर काही दिवसांनी लंचसाठी देखील ते एकत्र गेले होते. त्यांच्या सलग भेटींमुळे या दोघांचं अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. राघवला भेटण्यासाठी परिणीतीही दिल्लीत आली होती. राघव चढ्ढा यांना डेट करण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते पण परिणीतीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

मार्चमध्ये जेव्हा परिणीती आणि राघवच्या डेटिंगच्या बातम्या येत होत्या, तेव्हा आम आदमी पार्टीचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्विट करून त्यांच्या नात्याबद्दल उघड केले होते. संजीव अरोरा यांनी परिणीती आणि राघव यांना ट्विटरवर एकत्र असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. याशिवाय, ‘कोड नेम: तिरंगा’ या चित्रपटात एकत्र काम करणारा अभिनेता आणि गायक हार्डी संधूनेही त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांना दुजोरा दिला होता.

Dnyaneshwar: