मुंबई | Parineeti Chopra-Raghav Chadha – बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या अफेअरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. तसंच लवकरच ते लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हे दोघं चांगलेच चर्चेत आहेत. अशातच आता परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा झाला की काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याचं कारण म्हणजे परिणीती-राघव आयपीएलचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेले होते. त्यावेळीचे त्यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. तर यातील एका फोटोनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
या व्हायरल झालेल्या फोटोत परिणीती राघव यांच्या जवळ उभी आहे. तसंच राघव यांच्या खांद्यावर डोकं ठेवून ती मॅच पाहताना दिसत आहे. यावेळी परिणीतीच्या हातात एक अंगठी दिसत आहे. त्यामुळे या फोटोवरून त्या दोघांनी गुपचूप साखरपुडा केला असल्याचं म्हटलं जातंय.
दरम्यान, ‘द इंडियन एक्स्प्रेस’नं परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची तारीख निश्चित झाली असल्याची बातमी दिली होती. 13 मे रोजी या दोघांचा साखरपुडा होणार असल्याचं समोर आलं होतं. यादरम्यान, परिणीती-राघव यांचा एक फोटो व्हायरल झाल्यानं त्यांचा साखरपुडा झाला की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.