पेट्रोकेमिकल कौशल्य विकास परिषदेच्या अध्यक्षपदी पटकोटवार

पुणेpune news | पुणेस्थित रबर उद्योगातील प्रथितयश उद्योजक विनोद पटकोटवार यांची रबर, केमिकल आणि पेट्रोकेमिकल कौशल्य विकास परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

संस्थेच्या नवी दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सदर निवड करण्यात आली आहे. यापुढे परिषदेच्या कामकाजाची देखरेख, तसेच रबर, केमिकल आणि पेट्रोकेमिकल या क्षेत्रांशी संबंधित उद्योगांचा विकास व्हावा यासाठी संचालक मंडळाशी समन्वय साधून धोरणात्मक पावले उचलणे आदी जबाबदार्‍या पटकोटवार यांच्यावर असतील.

त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. रबर, केमिकल आणि पेट्रोकेमिकल कौशल्य विकास परिषदेचची स्थापना २०१२ या वर्षी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या अधिपत्याखाली करण्यात आली. परिषदेचे मुख्य उद्दिष्ट हे रबर, केमिकल आणि पेट्रोकेमिकल उद्योगांशी संबंधित प्रशिक्षण उपलब्ध करून देत तरुणांना या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणे असे आहे.

Dnyaneshwar: