एकाच गाडीतून पवार-दानवेंचा प्रवास

औरंगाबाद : राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांतील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तर दुसरीकडे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने चर्चेला उधाण आले आहे.
औरंगाबादमध्ये ज्या हॉटेलमध्ये शरद पवार थांबले होते, त्याच हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेसुद्धा काही वेळापूर्वी दाखल झाले होते.

त्यानंतर दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे. शरद पवार आणि रावसाहेब दानवे हे औरंगाबादहून गेवराईच्या दिशेने गेले. गेवराईत रविवारी माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Nilam: