पशू हल्ल्याने गेलेत राज्यात सर्वाधिक बळी

नवी दिल्ली : देशातील भटक्या प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये अनके जण जखमी होत असतात, कित्येक जणांचा त्यामध्ये मृत्यू होत असतो. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे देखील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. भटक्या जनावरांमुळे होणार्‍या मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन केंद्र सरकारने याबद्दल एक अहवाल तयार केला असून, त्या अहवालात असलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशभरात २.०३ कोटी इतक्या भटक्या प्राण्यांची संख्या झाली आहे.

या अहवालात करण्यात आलेल्या गणनमध्ये गायी आणि कुत्र्यांचा या लोकसंख्येत समावेश करण्यात आला आहे. गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये भटक्या प्राण्यांच्या हल्ल्यात ३८६० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण आहे.
भटक्या जनावरांमध्ये गोवंश , श्वान याना पकडून त्यांना पशू विभागाच्या अधिकार्‍यांच्या देखरेखीसाठी ठेवण्यात येणार आहे. आजारी असल्यास जनावरांचे लसीकरण करून माणसाला होणार्‍या संसर्गापासूनही समाजाचे रक्षण करण्यासाठी वैद्यकीय तपासण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आजारी किंवा कामासाठी उपयुक्त नसलेल्या जनावरांना सोडून देणार्‍या लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत,

admin: