यासिन मलिक-मनमोहन सिंग यांच्या सोबतचे फोटो व्हायरल- वाचा सविस्तर

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रन्टचा फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला आज टेरर फंडिंग प्रकरणात न्यायालयानं दोषी ठरवलं असून, एनआयए कोर्टानं जन्मठेप आणि १० लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, आता यासिन मलिकचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यासीन मलिकसोबत चर्चा करुन हस्तांदोलन करताना दिसत आहेत. अशा लोकांना तुरूंगात पाठवण्याऐवजी काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांचे स्वागत करण्यात आले, असा आरोपही सोशल मीडियावर लोक करत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो १७ फेब्रुवारी २००६ चा आहे. काश्मीरबाबत फुटीरतावादी नेते, इतर नेते आणि काश्मीरमधील संघटनांशी गोलमेज चर्चा करण्यापूर्वी त्यांनी जेकेएलएफ अध्यक्ष यासिन मलिक यांची भेट घेतली होती. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी यासीन मलिक यांना पंतप्रधान निवासस्थानी बोलावले होते.

या भेटीदरम्यान मनमोहन सिंग यांची यासिन मलिक यांच्याशी भेट झाली होती. पंतप्रधान निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. २०१९ मध्ये मोदी सरकारने यासिन मलिकच्या जेकेएलएफ संघटनेवर बंदी घातली. २०१७ मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. यासीनसह इतर अनेक फुटीरतावादी नेत्यांवरही टेरर फंडिंग प्रकरणी कारवाई करण्यात आली होती.

Prakash Harale: