छायाचित्र बनला जीवनाचा भाग

जागतिक छायाचित्रण दिन

हजार शब्दांत सांगता येत नाही ते केवळ छोट्याशा आकारात छापलेल्या छायाचित्रातून सांगता येते. फोटोग्राफी ही आजच्या आधुनिक जगाची परिभाषा बनली आहे.या तंत्रकलेने अवघं विश्‍वच नव्हे, तर अवकाशही व्यापून टाकलं आहे. छायाचित्रण हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. एका चित्रात हजार शब्दांचा अर्थ सामावलेला असतो, असे म्हटले जाते.

छायाचित्रे वेगवान आणि कधी कधी शब्दांपेक्षा अधिक प्रभावीपणे भावना व्यक्त करतात. सध्या तांत्रिक प्रगतीमुळे फोटोग्राफी प्रत्येक पाचपैकी एका व्यक्तीचा छंद बनली आहे. आजची पिढी सोशल मीडियावर छायाचित्रांच्या माध्यमातून व्यक्त होण्यात आणि अनुभव सांगण्यात खूप रस घेत आहे.

दर वर्षी १९ ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा केला जातो. १९व्या शतकाच्या सुरुवातीपासून, छायाचित्रण हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. जगभरातील असंख्य लोकांसाठी वैयक्तिक अभिव्यक्तीचे आणि कौतुकाचे सतत वाढत जाणारे माध्यम बनले आहे. फोटोग्राफीशिवाय जगाची कल्पना करणे कठीण आहे. ते विज्ञान, जाहिराती, वर्तमान मीडिया इव्हेंट्‌स इत्यादी सर्वव्यापी आहे.

जागतिक छायाचित्रण दिन १९ ऑगस्ट रोजी जगभरात साजरा केला जातो. सेल्फी घेण्यापासून ते युद्धांचे दस्तऐवजीकरण करण्यापर्यंत, फोटोग्राफी हा भूतकाळातील आठवणी म्हणून काम करणाऱ्या घटना आणि चित्रांची नोंद ठेवण्याचा एक मार्ग आहे. हा कला प्रकार साजरा करण्यासाठी, जागतिक छायाचित्रण दिन दर वर्षी १९ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. तर फोटोग्राफीला करिअर म्हणून पुढे जाण्यासाठी उत्साही व्यक्तींसाठी हा दिवस प्रेरणादायी ठरतो.

इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॅमेरा १९९० मध्ये जन्माला आला. त्यानंतर सातत्याने डिजिटल कॅमेऱ्यामध्ये बदल होत गेले, उत्क्रांती होत गेली. सध्या छायाचित्रण व्यवसाय नव्या क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे. त्या निमित्ताने अनेक हौशी फोटोग्राफर आपल्याला पाहायला मिळतात. हा दिवस त्या छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी साजरा करतात ज्यांनी आपले अनमोल क्षण छायाचित्राच्या रूपात कैद केले व त्यांना नेहमीसाठी स्मरणात ठेवले.

प्रकृतीने प्रत्येक प्राणिमात्राला जन्मत: एक कॅमेरा दिला आहे, ज्यामुळे ते प्रत्येक वस्तूच्या छबीला आपल्या डोक्यात अंकित करू शकते आणि तो कॅमेरा म्हणजे आपले डोळे. तसं पाहिलं, तर प्रत्येक प्राणी एक फोटोग्राफर आहे. वैज्ञानिक दृष्टीने माणसाने आपले साधन वाढविण्यास सुरुवात केली आणि अनेक आविष्कारांसोबत कृत्रिम लेन्सचा पण अाविष्कार झाला. वेळेसोबत समोर चालताना या लेन्सच्या छायाचित्रांना स्थायी रूपात समोर आणले. याच प्रवासाच्या यशाला आपण फोटोग्राफी डेच्या रूपात साजरा करतो.

दहा-पंधरा वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाइल… टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता, हाताळता येऊ लागले. तथापि, फोटोग्राफी या कलेतली रोचकता मात्र कायम राहिली आहे.

फोटो काढण्यासाठीची ‘एक्साइटमेंट’ तशीच आहे. जसजशी फोटोग्राफीची व्याप्ती वाढत गेली तसतशी त्याच्या व्यावसायिक कक्षाही रुंदावल्या. आज गरजेनुसार शेकडो विषयांचे छायाचित्रण व्यावसायिक म्हणून करता येते. त्यात व्यक्तिचित्रण, समारंभाचे छायाचित्रण, औद्योगिक, निसर्गचित्रण, फॅशन, वन्यजीवांची छायाचित्रे, स्थापत्यशास्त्र, क्रीडा (स्पोर्टस्‌), सुक्ष्म वस्तूंचे छायाचित्रण, अवकाशातून टिपलेली छायाचित्रे, जाहिरातींसाठी छायाचित्र काढणे, वर्तमानपत्रांसाठी छायाचित्रण, समुद्र तळातील छायाचित्रण, पर्यटन या व्यतिरिक्‍त पिक्‍चोरियल घडवणारी फोटोग्राफी अशा अनेक विषयांची जंत्री देता येईल.

मात्र या सगळ्या विषयांचे छायाचित्रण करण्याचे तंत्र आणि मंत्र आत्मसात करण्याची आवश्‍यकता असते. शिवाय स्वत:तील नवनिर्मितीच्या गुणांना वाव देण्याची गरज असते.

Prakash Harale: