PM मोदी आणि CM योगींचे फोटो कचरा गाडीत सापडल्याने खळबळ; प्रशासनाकडून सफाई कर्मचारी बडतर्फ

मथुरा : काही दिवसांपूर्वी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे जगभरातील मुस्लीम बहुल राष्ट्रांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध केला गेला होता. निषेधार्थ तेथील लोकांकडून नरेंद्र मोदी यांचे फोटो कचरा कुंडींवर लावण्यात आले होते. त्या घटनेचा भारतातील सर्वच पक्षांतील नेत्यांकडून निषेध करण्यात आला होता. मात्र, शानिवारी (१६ जुलै) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो उत्तर प्रदेशातील मथुरा मध्ये कचऱ्याच्या गाडीत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मथुरा मधील एक सफाई कर्मचारी नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे फोटो कचऱ्याच्या गाडीत घेऊन जातानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. कचऱ्याच्या गाडीतून फोटो नेत असलेल्या सफाई कर्मचाऱ्याला दोषी मानून त्याला महापालिका प्रशासनाकडून बडतर्फ करण्यात आले आहे.

बॉबीपुत्र दुलीचंद असे बडतर्फ करण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे. शनिवारी सकाळी कचरा गोळा केल्यानंतर तेथील फोटोही त्याने कचरा गाडीतच ठेवले, ते फोटो त्याने बाजूला काढून ठेवणे अपेक्षित होते मात्र त्याने फोटो तसेच कचऱ्याच्या गाडीत टाकले. ते पाहून स्थानिकांनी व्हिडीओ काढला. त्यानंतर कर्मचाऱ्याने हुज्जत घातली असल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेकडून त्याला बडतर्फ करण्यात आले. मात्र दुसरीकडे सफाई कर्मचाऱ्याची चूक नसल्याचं देखील बोलल्या जात आहे.

Dnyaneshwar: