चिंचवड पोटनिवडणुकीत 7 जणांचे आमदारकीचे स्वप्न भंगले; कारण वाचाच…

पुणे | पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये मुदतीत 40 उमेदवारांनी 53 अर्ज दाखल केले होते. यापैकी 33 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून 7 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहे. आम आदमी पार्टीचे मनोहर पाटील यांच्यासह एकूण सात उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.

भाजपच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप यांचा अर्ज वैध ठरला असून बदली उमेदवार शंकर जगताप यांचा डमी अर्ज अवैध ठरला आहे. राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल काटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलेले राहुल कलाटे यांचे अर्ज वैध ठरले आहेत. इतर राजकीय पक्षांपैकी बहुजन भारत पार्टीचे तुषार लोंढे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण कदम यांसह इतर 26 अपक्षांचे अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी माघारीची मुदत शुक्रवारपर्यंत आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी दाखल अर्जांची बुधवारी छाननी प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी वैध आणि अवैध ठरलेल्या उमेदवारांची घोषणा केली. चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण आणि निवडणूक पोलीस निरीक्षक अनिल यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या छाननीसाठी नामनिर्देशन पत्रे दाखल करणारे उमेदवार आणि त्यांचे उपस्थित होते.

Dnyaneshwar: