आज संध्याकाळी आकाशात पाहायला मिळणार दुर्मिळ दृश्य; संधीला मुकलात तर थेट 2040 मध्ये पाहू शकाल

Planet Parade : मंगळवारी संध्याकाळी जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहणार तेव्हा पश्चिमेकडे लक्षपूर्वक पाहिल्यास तुम्हाला पाच ग्रहांची मोत्यासारखी माळ दिसेल. तसे, हे दुर्मिळ दृश्य २५ ते ३० मार्च या कालावधीत पाहायला मिळत आहे. पण नासाचे खगोलशास्त्रज्ञ बिल कुक म्हणतात की, ही घटना पाहण्यासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजे मंगळवार 28 मार्च, कारण या दिवशी पृथ्वीवरून ग्रह अधिक स्पष्टपणे दिसू शकतात.

लक्षात घेण्याजोगी आणि कुतूहलाची बाब म्हणजे मंगळ, शुक्र आणि गुरू या ग्रहांना पाहण्यासाठी तुम्हाला दुर्बिणीचीही मदत घ्यावी लागणार नाही. तर, बुध आणि युरेनस पाहण्यासाठी मात्र तुम्हाला बराच आटापिटा करावा लागू शकतो. पण, दुर्बिण तुमची यात मदत करेल.

कधी पाहू शकाल हा योग?

ही Planet Parade तुम्ही मंगळवारी म्हणजेच 28 मार्च रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर पाहू शकाल. सूर्यास्तानंतर साधारण 30 मिनिटांनी हे ग्रह आकाशातून दिसेनासे होतील. त्यामुळं त्याआधीच तुम्ही हे अद्वितीय दृश्य पाहून घ्या. या संधीला मुकलात तर, थेट 17 वर्षांनंतर म्हणजेच 2040 मध्ये तुम्ही असंच काहीसं दृश्य पाहू शकाल.

Dnyaneshwar: