“…आंदोलन करणाऱ्या खेळाडूंना पगार दिला जातोय”, कुस्तीपटूंच्या आंदोलनावर ब्रिजभूषण सिंह यांचा दावा

नवी दिल्ली | Wrestler Protest – भारताच्या महिला कुस्तीपटूंनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात दिल्लीत आंदोलन पुकारलं आहे. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. तसंच या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील कुस्तीपटूंनी केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्तीनंतर आता ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच ब्रिजभूषण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही कुस्तीपटूंनी केली आहे. यादरम्यान आता ब्रिजभूषण यांनी मोठा दावा केला आहे.

ब्रिजभूषण सिंह हे काल (1 मे) माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “जर माझ्या पक्षानं मला राजीनामा देण्यास सांगितलं तर मी राजीनामा देईन. ‘तुकडे तुकडे गँग’, ‘शाहीन बाग’, ‘किसान आंदोलन’मध्ये सामील असलेल्या फौजांचं खरं लक्ष्य मी नसून भाजप पक्ष त्यांचं खरं लक्ष्य आहे. या आंदोलन करणाऱ्या खेळाडूंना पैसे दिले जात आहेत.”

“शाहीनबागप्रमाणे विरोध वाढत असून त्यांना यूपी आणि हरियाणाचं विभाजन करायचं आहे. पंतप्रधान मोदींना हे लोक शिव्या देतात. यामागे उद्योगपती आहेत तसंच या खेळाडूंनाही पगार दिला जातोय. यात उद्योगपतींचा पैसाही गुंतला आहे”, असंही ब्रिजभूषण म्हणाले.

Sumitra nalawade: