भाजपचे एक नम्र आणि कष्टाळू नेते; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गिरीश बापटांना श्रद्धांजली

Girish Bapat Passed Away : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं आज पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बापट आजारी होते. आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून संध्याकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. गिरीश बापटांच्या निधनामुळं पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शोक व्यक्त केला जात असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बापटांच्या आठवणी जागवत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणारा कष्टाळू नेता हरपल्याची भावना पीएम मोदींनी व्यक्त केली आहे.

गिरीश बापट एक नम्र आणि कष्टाळू नेते- नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यासोबत त्यांनी गिरीश बापट यांच्यासोबतच विमानतळावरील फोटोदेखील शेअर केला आहे. गिरीश बापट हे एक नम्र आणि कष्टाळू नेते होते. गिरीश बापट यांनी समाजाची तळमळीने सेवा केली. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आणि विशेषत: पुण्याच्या विकासासाठी ते उत्कट होते. त्यांचे निधन दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या संवेदना. ओम शांती, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

Dnyaneshwar: