नवी दिल्ली : (PM Narendra Modi On Formers) येणारं नवीन वर्ष ‘आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष’ म्हणून साजरी केले जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजरीसह तृणधान्यांची अधिकाधिक लागवड करावी, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठा तृणधान्य उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आपल्या देशातील शेतकरी बंधू-भगिनींना माझी विनंती आहे की, तृणधान्यांची अधिकाधिक लागवड करा आणि त्याचा लाभ घ्या, असं आवाहन मोदींनी यावेळी देशवाशियांना केलं आहे.
दरम्यान, आज झालेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरीकांना संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत एक ठराव मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रस्तावाला 70 देशांनी पाठिंबा दर्शविला आसल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.
पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले, आज जगभरात बाजरी या भरड धान्याबद्दल आकर्षण वाढत जात आहे. जेव्हा कोणीही परदेशी पाहुणे भारतात येतात, तेव्हा त्यांना हे पदार्थ खूप आवडतात. त्यामुळे ते पाहूणे बाजरी धान्याबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आसतात. आपल्या धान्यांमध्ये खूप वैविध्य आहे. ज्वारी, बाजरी, नाचरी, वरी, राळे, कंगणी, चेना, कोडो, कुटकी, कुट्टू ही तृणधान्य आहेत. हे धान्य आरोग्यपुर्ण असून त्यात प्रथिने, तंतुमय पदार्थ आणि खजिने असतात. यामुळे पोट आणि यकृतांचे आजार कुपोषणाशी लढा देण्यासाठी तृणधान्ये खूप उपयोगी आहेत असं मोदींनी सांगितलं.