काळी टोपी, प्रिंटेड टी शर्ट अन् जॅकेट; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा लूक पाहिलाय काय?

कर्नाटक | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा नवा लूक व्हायरल झाला आहे. डोक्यावर हॅट, हातात जॅकेट आणि डोळ्याला चष्मा असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनोखा लूक व्हायरल झाला आहे. बांदीपूर टायगर रिझर्व्हमध्ये मोदींचा दौरा आहे. या जंगल सफारीसाठी मोदींनी तयारी केली आहे. तोच फोटो आता व्हायरल होत असून मोदींच्या या अनोख्या लूकची प्रचंड चर्चा होत आहे. मोदी आज ही जंगल सफारी करणार आहेत. त्यासाठी ते कालच मैसुरू येथे पोहोचले. प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने मोदी आज वाघांची संख्या सांगणार आहेत. या वाघांची गणती सुरूही झाली आहे.

मोदी आज कर्नाटकातील बांदीपूर टायगर रिझर्व्हमध्ये आहेत. यावेळी ते कामगारांशी चर्चा करणार आहेत. तसेच स्मारकाशी संबंधित एक नाणंही मोदी जारी करणार आहेत. पुढील महिन्यात कर्नाटकात निवडणुका आहेत. 10 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण तापलं आहे. सर्व ओपिनियन पोलमध्ये काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा कर्नाटक दौरा चर्चेचा विषय ठरला आहे.

Dnyaneshwar: