बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसणार

पीएमपीच्या उत्पन्नात घट

गेल्या काही दिवसापासून बसमध्ये महिलांच्या छेडछाडीच्या घटना घडल्या तर काही चोरीच्या घटना घडल्याने आता प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अशीच नुकतीच घटना घडली ती म्हणजे स्वारगेट (Swargate) हून वाकडेवाडी (Wakadewadi)कडे जाणाऱ्या बस (Bus)मध्ये पुरुषाने महिला प्रवाशाला छेडल्याने चोप दिल्याची घटना नुकतीच घडली. या सर्व पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पीएमपी प्रशासनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड (PCMC)मधील बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV-Camera) बसविण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात पीएमपीच्या मालकीच्या सुमारे १००६ बसेसमध्ये प्रत्येकी तीन कॅमेरे बसविले जाणार आहेत. याच्या निविदा प्रक्रियेचे काम सुरू असून,येत्या दोन महिन्यात प्रत्येक बसमध्ये कॅमेरे बसविले जाणार आहेत. पीएमपीच्या ताफ्यात २१०० बस असल्या तरीही प्रत्यक्षात रस्त्यावर १६५० बस धावत आहेत.पैकी १००६ बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत. उर्वरित बस भाडेतत्त्वावरील आहेत. पीएमपी (PMP)प्रशासन पहिल्यांदाच मालकीच्या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवीत आहेत. पीएमपी बसमधून दररोज सुमारे १३ लाख प्रवासी प्रवास करतात. पैकी १००६ बसमध्ये टप्प्याटप्प्याने कॅमेरे बसविले जाणार असल्याने किमान ९ लाख प्रवासी प्रशासनाच्या नजरेत राहणार आहेत.

Rashtra Sanchar Digital: