हडपसरमध्ये बीआरटी मार्गावर पीएमटी आणि लक्झरी बसमध्ये भीषण अपघात

पुणे : हडपसरमधील बिआरटी (Hadapsar, BRT) मार्गावर ओव्हरटेक करण्याच्या नादात रामटेकडीच्या ब्रिजवर (Ramtekadi bridge, Bus Accident) खाजगी बस (travels) पिएमपिएलवर (PMPML, Accident) जाऊन आदळलल्याची माहिती आहे. या अपघातात काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. (PMPML and Luxury Bus/Travels Accident at Ramtekadi Bridge Hadapsar)

आज (शनिवार) पहाटे साडेचारच्या सुमारास BRT रोडमध्ये लक्झरी बस आणि PMT बसची समोरासमोर टक्कर झाली. यामध्ये दोन्ही गाड्यांचे ड्रायव्हर गंभीर जखमी असून, काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. क्रेनने गाड्या रस्त्यातून बाजूला काढल्या आहेत त्यामुळे ट्रॅफीक सुरळीत आहे.

रात्रीच्या वेळी लक्झरी बस / ट्रॅव्हल्स जोरात धावतात. अनेकदा ओव्हरटेक करण्याच्या नादात चुकीच्या रस्त्याने गाड्या घेतल्या जातात त्यामुळे अपघात होण्याच्या शक्यता जास्त असतात. त्याचबरोबर बर्‍याचदा रात्री धावणार्‍या पीएलमपीएमएलच्या बस भरधाव वेगात दिसतात. त्यामुळे पीएमटी बसच्या देखील अपघातांची संख्या वाढत आहेत. अनेकदा रस्ता देण्यावरून ट्रॅव्हल्स आणि पीएमटी ड्रायव्हर यांच्याच बाचाबाची होताना दिसते.

Dnyaneshwar: