पुणे : पुण्यातील सिंहगढ रस्त्याला लागून असलेल्या किरकटवाडी येथील मारुती मंदिरातील दानपेटी फोडून चोरी झाल्याची एक महिना होत आला आहे. चोरी झाल्याच्या त्याच दिवशी सोसायटीतील नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चित्रांचा आधार घेऊन चोरांचे घर शोधून काढले होते. आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. परंतु अजूनही हवेली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले नाही आणि तापाशी संथ गतीने चालू असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या महिन्यात म्हणजे १२ एप्रिल ला सकाळी नियमित काकडआरती साठी मंदिरात आलेय लोकांना दानपेटी फोडून चोरी झाल्याचे दिसले होते. मंदिरातील कॅमेऱ्यात एक चोर दिसून आला. तो दानपेटीतुन मोठ्या प्रमाणात पैसे आणि इतर ऐवज चोरताना तो दिसत होता.
कॅमेऱ्यात कैद झालेल्या फोटोच्या आधारे परिसरात सुरू असलेल्या बांधकाम साईटवर संबंधित व्यक्तीचा शोध घेतला असता एका ठिकाणी कामगारांनी तो फोटो ओळखला व त्याचे किरकटवाडीतील घर दाखवले. स्थानिकांनी ही माहिती पोलीसांना दिली.पोलीस तेथे गेले तेव्हा तो फरार झाला होता.
याबाबत नागरिकांनी यांनी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोन वेळा येऊन मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली.