सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल, याकडे पोलिसांनी अधिकाधिक लक्ष द्यावे – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

शिर्डी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे आणि शिर्डी येथील पोलीस अंमलदारांच्या ११२ निवासस्थानांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन केले. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे की, सरकार पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. तसेच सरकार सर्व मदत करायला तयार आहे, पण पोलीस दलाने देखील सरकारची प्रतिमा उंचावण्यासाठी काम केले पाहिजे.

“आपल्या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कशी अबाधित राहील, अवैध धंदे कसे बंद होतील आणि पोलिस ठाण्याचा कारभार कसा पारदर्शक होईल आणि सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल, याकडे पोलिसांनी अधिकाधिक लक्ष द्यावे. सरकार पोलिस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.” असंही दिलीप वळसे पाटील म्हणाले.

“तुम्हाला सर्व प्रकारची मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण पोलिसांनी देखील सरकारचे प्रतिनिधी म्हणून तळागाळात सरकारची प्रतिमा उंचावण्यासाठी पारदर्शक पद्धतीने काम केले पाहिजे,” असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.

“राज्यातील पोलिसांना सुसज्ज घरे मिळाल्यास त्यांच्या कार्यक्षमतेत निश्चित वाढ होणार आहे. राज्यातील पोलिसांना पुढील दोन महिन्यांत ६८५३ घरे उपलब्ध करून देण्यात येतील. शासनाने एसआरपीएफमधील पोलिसांना राज्य पोलिसात घेण्याचा निर्णय घेतला. पोलीस शिपायास निवृत्तीपर्यंत पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला.” असंही दिलीप वळसे म्हणाले.

Sumitra nalawade: