भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये पोस्टर वॉर

चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीची फ्लेक्स बाजी

पुणे | पुण्यामध्ये (Pune) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या मतदारसंघात फ्लेक्स फडकवण्यात आलेले आहेत. ‘किती हा ढोंगीपणा?’ असं म्हणत प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत.

किती हा ढोंगीपणा बास करा ? अशा आशयाच्या फ्लेक्समुळे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये फ्लेक्स वॉर रंगलेले दिसत आहे.

याविषयी अधिक माहिती देत असताना कोथरूड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश गुरुनानी म्हणाले, राष्ट्रवादीने ओबीसींच्या अवमानच्या मुद्द्यावरून भाजपला पोस्टरद्वारे खडे बोल सुनावले. हिम्मत असेल तर महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर आगोदर कारवाई करा ? क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अवमान करणाऱ्यांना पाठीशी घालणारे आता ओबीसींच्या मानापनाच्या गोष्टी करणार? महाराष्ट्रातला ओबीसी तुमच्या या भूलथापांना बळी पडणार नाही.

Sumitra nalawade: