निरगुडसर | Viral Video – आत्तापर्यंत आपण बटाटा हा जमिनीखाली आलेला पाहीला आहे. मात्र, हाच बटाटा जर झाडाच्या फांदीला आला तर तुम्हालाही विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. एका शेतकऱ्याच्या शेतात चक्क झाडाला बटाटे लागले आहेत. हे बटाटे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तसंच या बटाट्याच्या झाडाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोयय
निरगुडसर ता. आंबेगाव येथील शेतकरी संदीप व धनेश पांडुरंग वळसे पाटील यांच्या शेतात चक्क एका झाडाला बटाटे आले आहेत. लहान मोठे 17 ते 18 बटाटे झाडाला लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कुतूहलाचा विषय बनला आहे.
शेतकरी संदीप व धनेश पांडुरंग वळसे पाटील यांची साडेतीन एकर क्षेत्र जमीन आहे. त्यामध्ये त्यांनी बटाटा लागवड केली आहे. सध्या पीक काढणीला असल्यानं पिकाचा पाला कापणी सुरू असतानाच एका झाडाला चक्क बटाटे आढळून आले आहेत. चक्क 17 ते 18 बटाटे झाडाच्या फांद्यांना आले आहेत. झाडाला बटाटे आल्यानं परिसरात कुतूहलाचा विषय बनला आहे. हे बटाटे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.