सावधान! अभिनेता प्रभासचं फेसबुक अकाऊंट हॅक; हॅकरनं ‘हे’ व्हिडीओही केले शेअर..

Prabhas Facebook Page Hacked : अभिनेता प्रभास (Prabhas) हा साऊथ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहे. त्याने साऊथ चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रभासचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत. प्रभास हा सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. तो फक्त त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती सोशल मीडियावर शेअर करतो.

मात्र, गुरुवारी दि. 27 जुलै रात्री प्रभासचे फेसबुक पेज हॅक करण्यात आले असल्याची माहिती त्याने ट्विटरवर दिली अन् सिनेक्षेत्रात खळबळ उडाली. एवढचं नाही तर, हॅकरनं प्रभासच्या फेसबुकवरून ‘अनलकी ह्युमन’ आणि ‘बॉल फेल्स अराउंड द वर्ल्ड’ असे दोन व्हायरल व्हिडिओ शेअर केले. प्रभासच्या फेसबुक पेजवर 24 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. दरम्यान, प्रभासने इंस्टाग्रामवर फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली. त्याने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले, “सर्वांना नमस्कार, माझ्या फेसबुक पेज हॅक झाले. माझी टीम ही समस्या सोडवत आहे.

प्रभासचे आगामी चित्रपट
‘साहो’, ‘राधे श्याम’ आणि ‘आदिपुरुष’ हे प्रभासचे चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप ठरले. आता प्रभासचा सालार पार्ट 1: सीजफायर हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. प्रशांत नीलने यापूर्वी यश स्टारर ब्लॉकबस्टर ‘केजीएफ सीरिज’ दिग्दर्शित केले आहे. ‘सालार’ हा देखील ‘केजीएफ युनिव्हर्स’चा एक भाग असल्याचा अंदाज चाहते लावत आहेत. श्रुती हासन आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा अॅक्शनपट 28 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Prakash Harale: