चेन्नई | आर. प्रग्नानंधा (R. Praggnanandhaa) वर्ल्ड कप बुद्धिबळ स्पर्धेत खेळत असताना एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या आर. नागालक्ष्मी यांच्या डोळ्यातील चमक सर्वत्र चर्चेचा विषय आहे. गॅरी कास्पारोव यांनीही प्रग्नानंधाच्या वाटचालीत त्याच्या आईचे प्रोत्साहन मोलाचे असल्याचे सांगितले आहे.
भारतीय क्रीडापटूंच्या यशात पालकांचा वाटा मोलाचा असतो. सुमारे ३५ वर्षापूर्वी आनंदने बुद्धिळ जगतात वर्चस्व राखण्यास सुरुवात केली, त्यावेळी आनंद आणि त्याची आई सुशिला यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती, त्याचीच आठवण प्रग्नानंधाच्या आईच्या डोळ्यातील कौतुक बघून होते.