“त्या पॅकेटमधील माल…” गुटखा खाण्याबद्दल प्राजक्ता माळीचे मोठे वक्तव्य

‘रानबाजार’ ही मराठी वेबसीरिज प्रचंड चर्चेत आली. या वेबसीरिजच्या माध्यमातून अभिनेत्री (Prajakta Mali) प्राजक्ता माळी एका बोल्ड आणि सुंदर भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली. प्राजक्ताच्या आधीच्या कोणत्याच भूमिका या भूमिकेशी साधर्म्य नसल्याने तिच्या या वेबसीरिजमधील भूमिकेचं प्रचंड कौतुकही झालं आणि तिला खूप ट्रोल सुद्धा करण्यात आलं. या वेबसीरिजदरम्यान ती गुटखा खायची, असं अनेकदा बोललं जायचं. नुकतंच प्राजक्ता माळीने याबद्दल भाष्य केले आहे.

‘रानबाजार’ वेबसीरिजमध्ये प्राजक्ताने कामाठीपुरामधील सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. रत्ना असे तिच्या पात्राचे नावं होतं. यावेळी तिने काही बोल्ड सीनही दिले होते. ज्यावरुन तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. यातील काही दृश्यांमध्ये प्राजक्ता ही गुटखा खात असल्याचे दिसले होते. यावरुन प्राजक्ता ही कायम गुटखा खात असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत प्राजक्ताने यावर भाष्य केले.

यावेळी प्राजक्ताला विचारण्यात आले, ‘रानबाजार’ वेबसीरिजदरम्यान साकारलेल्या पात्रासाठी खरंच गुटखा खायची? त्यावर तिने नाही असे एका सेकंदात म्हटले. ती म्हणाली, “त्यावेळी मी बडीशेप खायचे. त्या पॅकेटमध्ये बडीशेप असायची. त्याचं पॅकेजिंग सारखंच असायचं. पण त्याच्या आत असलेला माल मात्र वेगळा असायचा. हे शक्यच नाही”, असे प्राजक्ता म्हणाली.

Dnyaneshwar: