बाॅलिवूडचा ‘हा’ अभिनेता आहे प्राजक्ता माळीचा पहिला क्रश, स्वत:च केला खुलासा; म्हणाली, “मला…”

मुंबई | Prajakta Mali – मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं तिच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. प्राजक्तानं अनेक सुपरहिट मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचा चाहतावर्गही लाखोंच्या संख्येत आहे. तसंच प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तर आता प्राजक्तानं तिच्या पहिल्या क्रशबाबत सांगितलं आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

नुकतीच प्राजक्तानं ‘लोकमत’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं तिच्या क्रशबाबत खुलासा केला आहे. प्राजक्ता म्हणाली की, “मला सलमान खान (Salman Khan) खूप आवडायचा. मी लहान होते..दोन तीन वर्षांची. तेव्हा माझ्या आतेभावाचा सलमान आवडता हिरो होता. त्यानं मला शिकवलं होतं त्यामुळे मी म्हणायचे की मला सलमान खानशी लग्न करायचं आहे.”

प्राजक्तानं सलमान खानबद्दल केलेलं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. तसंच यापूर्वी प्राजक्तानं एका मुलाखतीत तिला अभिनेता वैभव तत्त्ववादी आवडायचा असं सांगितलं होतं. ‘काॅफी आणि बरंच काही’ या चित्रपटापासून वैभव तिला आवडायाचा असंही तिनं सांगितलं होतं.

Sumitra nalawade: