अकोला | Prakash Ambedkar On Narendra Modi – वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. भारताची अर्थव्यवस्था दारूड्यासारखी झाली आहे. दारूड्या जसं एक-एक साहित्य विकतो तसाच देशाचा कारभार सुरू आहे. पंतप्रधानांना मी दारूडा म्हणत नाही. पण त्यांची वागणूक दारूड्यासारखी आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी पंंतप्रधान मोदींवर केली आहे. ते अकोल्यात भारतीय बौद्ध महासभेनं घेतलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
“दाडू इंदुरीकरांचं ‘गाढवाचं लग्न’ हे नाटक बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिल्यानंतर त्यांचा मोठेपणा दिसून आला होता. राजकीय वैर न ठेवता मनाचा मोठेपणा जसा बाळासाहेब ठाकरेंमध्ये (Balasaheb Thackeray) होता, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये आणि शरद पवारांमध्ये (Sharad Pawar) नाही”, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांचं (Devendra Fadnavis) डिमोशन झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर ते उद्या अकोल्यात येत आहेत, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला. तसंच ग्रामपंचायत निवडणुका वंचित लढणार आहे अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. कार्यकर्त्यांनी या निवडणुका ताकदीने लढवायच्या. एकमेकांच्या उरावर बसायचं असेल तर खुशाल बसा. आरेला कारे करण्याची तयारी ठेवा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.