“तीन तिघाड, काम बिघाड?”; वंचितला महाविकास आघाडीत घेण्यावरून मतभेत

मुंबई : (Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi And Mahavikas Aghadi, Mahamorcha) चार महिन्यापूर्वी शिवसेना विभागली (Maharashtra Political Crisis) आणि ठाकरे समर्थक शिवसेनेतून (shivsena uddhav balasaheb thackereyu) बघता बघता शेकडो नेते , कार्यकर्ते शिंदे गटात (Balasahebanchi Shivsena) गेले. त्यामुळे शिवसेनेला ईतर पक्षांसोबत युती करण्याची साहजिकच गरज भासली आहे. त्यावर त्यांनी संभाजी ब्रीगेडसोबत (Sambhaji Brigade) देखील युती साठी चर्चा शिवसेनेची झाली आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar) देखील शिवसेना येणार असल्याची माहिती होती. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत वक्तव्य देखील केलं होतं. मात्र, महाविकास आघाडीत वंचितला घेण्यावरून विरोध असल्याची माहिती आहे. (Mahavikas Aghadi Mahamorcha Mumbai)

वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे वंचितशी मतभेत असल्याने त्यांचा वंचितला महाविकास आघाडीत घेण्यासाठी विरोध असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. यासंबंधित उद्धव ठाकरे यांनीच काहीतरी निर्णय घ्यावा असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकरांना महामोर्चात सहभागी होण्यावरून प्रश्न विचारण्यात आला होता. प्रकाश आंबेडकर मोर्चाला उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना कारण विचारण्यात आले. त्यांनी उत्तर देताना म्हणाले की, “मोर्चा हा महाविकास आघाडीचा होता. आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा वंचितला घेण्यावरून विरोध आहे. त्यामुळे मोर्चात जाण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. आम्ही शिवसेनेसोबत युती करण्यासाठी तयार आहोत मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनीच काहीतरी निर्णय घ्यायला हवा.’

Dnyaneshwar: