मुंबई : (Prakash Mahajan On Uddhav Thackeray) मनसेला नवीन उभारी देण्यासाठी सध्या अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्याकडून महाराष्ट्रभर ‘घे भरारी’ अभियान राबवण्यात येत आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मनसेचे जेष्ठ नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जोरदार खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले, मला नवरा बनवण्याचे वचन दिले, असं स्वप्न एके दिवशी पक्षप्रमुखाला पडलं. पण हा शब्द देताना तिथे फक्त उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अमित शाहच (Amit Shah) उपस्थित होते. सोबत फक्त बाळासाहेबांचा फोटो होता. मात्र, असं काही वजनच दिलं नव्हतं असं भाजपनं सांगितलं, त्यामुळे वादाला सुरुवात झाली.
दरम्यान, त्यानंतर भाजप आणि शिवसेना नेत्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. मात्र, यामध्ये मनसे नेते उडी घेताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील हा वाद उखरुन काढला होता. आता महाजन या वादावर म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो समोर ठेवून दोघांनाही विचारावं नक्की काय झालं. पण त्याच दिवशी बाळासाहेब माझ्या स्वप्नात आले. आणि मला म्हणाले, माझाच मुलगा खोटं बोलतंय, असं म्हणत महाजन यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडलली आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेना विरुद्ध मनसे असं वाकयुद्ध रंगण्याची दाट शक्यता आहे.
पुढे महाजन म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांना कधी मातोश्री आणि सेना भवनला येऊ दिले नाही. मात्र तुम्ही एका मुख्यमंत्रीपदासाठी मातोश्री सोडत काँग्रेसकडे जाऊन बैठका घेता? फक्त एका मुख्यमंत्री पदासाठी, असा संताप त्यांनी व्यक्त केला. ही अंधारे बाई काय आली, शिवसेनेत ज्या सगळ्या उजेडात होत्या, त्या अंधारात गेल्या. मला एक दिवस माझे संपादक मित्र म्हणाले, अंधारेला तूच तोंड देऊ शकतो. मी म्हटलं, या वयात मला कोणत्या बाईच्या तोंडाला लागायला सांगता, अशी टीका त्यांनी केली.
यावेळी त्यांनी शिंदे सरकारवरही टीका केली. हे सरकार शेतकऱ्यांसाठी काही करायला तयार नाही. काही वर्षांपूर्वी अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक होणार होते. त्याचे अजून काही झाले नाही. हे लोक शिववाजी महाराजांना फसवू शकतात, ते तुम्हाला आम्हाला असेच फसवू शकतात, असा हल्ला त्यांनी चढवला.